राष्ट्रीय

हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची नायबसिंह सैनी; सलग दुसऱ्यांदा घेतली शपथ

ओबीसी समाजाचे नेते नायबसिंह सैनी यांनी गुरुवारी सलग दुसऱ्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Swapnil S

चंडीगड : ओबीसी समाजाचे नेते नायबसिंह सैनी यांनी गुरुवारी सलग दुसऱ्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंचकुला येथे झालेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. सैनी यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली.

हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांच्यासह १३ मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुरुवारी वाल्मिकी जयंती असल्याचे औचित्य साधून शपथविधी ठरविण्यात आला.

हरयाणामध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात १३ मंत्री असतील. शपथ घेतल्यानंतर सैनी यांनी वाल्मिकी भवनला भेट दिली आणि पंचकुला येथील मनसा देवी मंदिरात आणि गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हरयाणातील भाजप सरकारने राज्याला झपाट्याने पुढे नेण्याचे ठरविले आहे, असे सैनी यांनी वार्ताहरांना सांगितले. भाजपच्या संकल्पपत्राची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा