राष्ट्रीय

ओप्पो इंडियाच्या वतीने कोट्यावधी रुपयांची सीमाशुल्क चोरी उघड

केंद्रीय एजन्सींना चीनी मोबाईल फोन निर्माता शाओमी आणि विवो विरुद्धच्या तपासात मोठ्या त्रुटी आढळल्या होत्या.

वृत्तसंस्था

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोबाईल कंपनी ओप्पो इंडियाच्या परिसरावर छापा टाकला आहे. या छाप्यानंतर, डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)ने ओप्पो इंडियाच्या वतीने ४३८९ कोटी रुपयांची सीमाशुल्क चोरी उघड केली आहे. ओप्पो इंडियाने प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी/ब्रँड/ आयपीआर लायसन्स इत्यादींच्या बदल्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना 'रॉयल्टी' आणि 'परवाना शुल्क' भरले आहे, यापैकी अनेक कंपन्या चीनमध्‍ये देखील आहेत हे तपासात उघड झाले आहे.

यापूर्वी, केंद्रीय एजन्सींना चीनी मोबाईल फोन निर्माता शाओमी आणि विवो विरुद्धच्या तपासात मोठ्या त्रुटी आढळल्या होत्या. आता डीआरआयच्या तपासात ओप्पो कंपनीच्या ४३८९ कोटी रुपयांच्या कस्टम ड्युटी चुकवल्याचेही प्रकरण समोर आलं आहे. डीआरआयने कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर ओप्पो मोबाइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मोठ्या प्रमाणावर कस्टम ड्युटी चुकवल्याचे म्हटले आहे.

ओप्पो इंडिया कंपनी भारतीय बाजारपेठेत मोबाईल फोनचे उत्पादन, असेंबलिंग, घाऊक व्यापार, मोबाइल हँडसेट वितरण आणि अॅक्सेसरीजचा व्यवसाय करते. ही कंपनी चीनच्या Guangdong OPPO Mobile Telecommunication Corporation Limited ची उपकंपनी आहे. ओप्पो इंडिया उत्पादनांमध्ये भारतातील लोकप्रिय मोबाइल फोन ब्रँड ओप्पो, वनप्लस आणि रिअलमी यांचाही समावेश आहे. छाप्यात कस्टम ड्युटीमध्ये गडबड झाल्याची बाब समोर आली

केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ओप्पोच्या कार्यालयांवर आणि काही उच्चस्तरीय व्यवस्थापकांच्या घरांवर तपासणी आणि छापे टाकले होते. तपासादरम्यान असे आढळून आले आहे की ओप्पो इंडियाने मोबाईलच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीची माहिती दिलेली नाही. त्यामुळे कंपनीला सुमारे २९८१ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी सूट मिळाली आहे. तपासादरम्यान कंपनी आणि इंडिया बेस्ड सप्लायर्सच्या काही उच्च व्यवस्थापकांची चौकशी करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीत असेही सांगण्यात आले आहे की, ओप्पो इंडियाने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना रॉयल्टीच्या नावावर पैसेही दिले आहेत. या कंपन्यांमध्ये चीनमधील काही कंपन्यांचाही समावेश आहे. ज्या उत्पादनांसाठी कंपनीने रॉयल्टी आणि परवाना शुल्क भरले आहे त्याचा तपशील त्या वस्तू आयात करताना व्यवहार मूल्यामध्ये उघड केलेला नाही.

ओप्पो इंडियाने अशा प्रकारे सुमारे १४०८ कोटी रुपये कस्टम ड्युटी भरलेली नाही. यासोबतच कंपनीने ४५० कोटी रुपयांची ऐच्छिक ठेवही ठेवली आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप