एक्स @BellamSwathi
राष्ट्रीय

‘गगनयान’ प्रकल्पात पाकची हेरगिरी; ISI महिला हस्तकाकडून हनीट्रॅपचे जाळे, आग्रा शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला साथीदारासह अटक

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ला गोपनीय लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पुरविल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आग्रा येथील शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचारी रवींद्रकुमार आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

Swapnil S

आग्रा : पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ला गोपनीय लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पुरविल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आग्रा येथील शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचारी रवींद्रकुमार आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

‘आयएसआय’च्या महिला हस्तकाने रवींद्रकुमार याला हनीट्रॅपमध्ये अडकविले आणि समाजमाध्यमातून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर ती त्याच्याकडून संवेदनशील माहिती जमा करू लागली. या जाळ्यात रवींद्र कुमार अडकत गेला. आता उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून रवींद्रची कसून चौकशी करण्यात येत असून देशात ‘आयएसआय’चे जाळे पसरले आहे का, याचा शोध घेतला रवींद्र कुमारला ‘आयएसआय’ महिला हस्तकाने नेहा शर्मा नावाने बनावट खाते बनवून जाळ्यात ओढले. तपासात महिलेने स्वत:ला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची हस्तक असल्याचे सांगितले. त्यानंतर पैशाचे आमिष दाखवून रवींद्रकडून गोपनीय माहिती काढून घेतली. रवींद्रनेही ‘आयएसआय’ हस्तकाला शस्त्रनिर्मिती कारखान्याशी निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाठवली. त्यामध्ये शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या दैनंदिन उत्पादन अहवालाचाही समावेश आहे. त्याशिवाय छाननी समितीचे काही दस्तऐवज आहेत. इतकेच नव्हे, तर ड्रोन, गगनयान प्रकल्पाबाबतही महत्त्वाची माहिती उघड करण्यात आली आहे, असे ‘एटीएस’च्या तपासातून समोर आले आहे.

उत्तर प्रदेश एटीएसने रवींद्रचा मोबाइल तपासला असता त्यात सैन्य आणि शस्त्रनिर्मिती कारखान्यातील काही गोपनीय कागदपत्रे सापडली. त्यात ५१ गुरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांची आणि लॉजिस्टीक ड्रोनच्या चाचणीची काही माहिती आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही संवेदनशील कागदपत्रे शत्रू देश पाकिस्तानला त्याने पाठवली होती. नेहा शर्मा नावाने पाकिस्तानी महिला हस्तकाने रवींद्रशी फेसबुकवर मैत्री वाढवली. दोघांनी एकमेकांना भ्रमणध्वनी क्रमांक दिले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर चॅट, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही झाले. हळूहळू महिला हस्तकाने रवींद्रकुमारला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर भारताशी निगडित गोपनीय माहिती ही महिला रवींद्र कुमारकडून मिळवू लागली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. रवींद्र आणि त्याच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. तपासावेळी बरेच महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे देशातील ‘आयएसआय’च्या जाळ्याचा पर्दाफाश होण्यास मदत मिळू शकते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश