राष्ट्रीय

अदाणी प्रकरणाचे संसदेत उमटले पडसाद, दोन्ही सभागृहाचे काम तहकूब

हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यात आली आणि दोन्ही सभागृहात या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्याचा मुद्दा उपस्थित

प्रतिनिधी

संसदेत आज झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. अदानी प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि अन्य १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यात आली आणि दोन्ही सभागृहात या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यावर भर देण्यात आला. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेल्या बैठकीत काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनता दल (संयुक्त) आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य