राष्ट्रीय

तिहार तुरुंगात ‘क्वीक रिस्पॉन्स टीम’ तैनात होणार; तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय

या क्यूआरटीत तामिळनाडू स्पेशल पोलीस, सीआरपीएफचे जवान तैनात असतील. त्यांच्याकडे दंगलविरोधी सामुग्री असेल

नवशक्ती Web Desk

तिहार तुरुंगात १९ दिवसांत गँगवॉरमध्ये दोघांचा बळी गेल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाला जाग आली आहे. आता तुरुंगातील अतिसंवेदनशील बॅरकबाहेर क्वीक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्यूआरटीत तामिळनाडू स्पेशल पोलीस, सीआरपीएफचे जवान तैनात असतील. त्यांच्याकडे दंगलविरोधी सामुग्री असेल. त्यात हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट, चिल्ली पावडर, मात्र त्यांच्याकडे हत्यार नसतील. तुरुंगाच्याबाहेर आयटीबीपीचे जवान तैनात असतील.

गँगस्टर टिल्लू ताजपुरिया हत्याप्रकरणी तिहारमधील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. भविष्यात या घटना रोखण्यासाठी क्यूआरटी नेमल्या आहेत. तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ताजपुरिया याच्या हत्येच्यावेळी आपत्कालिन परिस्थितीत सायरन बंद पडला होता. तो का बंद पडला होता त्याची चौकशी सुरू केली आहे.

अतिधोकादायक बॅरेकबाहेर हे क्यूआरटी पथक तैनात केले जाईल. कैद्यांमध्ये मारामारी झाल्यास तात्काळ त्याला तात्काळ प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट