राष्ट्रीय

राहुल गांधी यांची 'न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड येथून पुन्हा सुरू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली.

Swapnil S

रामगड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. रविवारी जिल्ह्यातील सिद्धू-कान्हू मैदानावर रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा सोमवारी सकाळी महात्मा गांधी चौकातून पुन्हा निघाली. या दरम्यान राहुल गांधी स्वातंत्र्यसैनिक शहीद शेख भिखारी आणि टिकैत उमरो सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतील, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले. रांची जिल्ह्यातील इरबा येथे पोहोचल्यानंतर ते इंदिरा गांधी हातमाग प्रक्रिया मैदानावर विणकरांशी संवाद साधतील, असे ते म्हणाले. दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा रांचीच्या शहीद मैदानावर पोहोचेल, जिथे काँग्रेस खासदार जाहीर सभेत ते भाषण करतील. राहुल गांधी रविवारी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष 'जल-जंगल-जमीन' वर आदिवासींच्या हक्कांसाठी उभा आहे. झारखंडमध्ये अशा वेळी ही यात्रा सुरू आहे जेव्हा जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागणार आहे. काँग्रेस हा या ठिकाणी आघाडीचा घटक आहे. गांधींचा रात्रीचा मुक्काम सोमवारी खुंटी जिल्ह्यात होणार आहे. ही यात्रा ८०४ किमीचा प्रवास करून दोन टप्प्यांत आठ दिवसांत राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश यात्रेत करणार आहे.

आजचे राशिभविष्य, ३० मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत.

Ebola Virus Alert : इबोला व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला

मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी घेतले नाही वेतन; अब्जाधीश उद्योगपतीचा लाभांशच राहिला मुख्य उत्पन्नस्रोत

कोथिंबीर जास्त दिवस टिकवायचीये ? 'या' ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा