राष्ट्रीय

पावसाचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत! कमी दाबाचा पट्टा तयार होणार, महागाई वाढण्याची चिन्हे

यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल्यास पिकांचे नुकसान होऊन महागाई वाढण्याचे संकेत दिसत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता. आता ऑगस्ट संपून सप्टेंबर सुरू होण्याची वेळ आली आहे. यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल्यास पिकांचे नुकसान होऊन महागाई वाढण्याचे संकेत दिसत आहेत.

केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये यंदा पूर आला होता. त्यानंतर आता गुजरात, राजस्थानमध्ये पावसाचे धूमशान सुरू आहे.

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार आहे. यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदीचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. यामुळे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.

पुढील पीक थंडीत पेरले गेले तर त्याचा फायदा पिकाला होणार आहे. कारण जमिनीमध्ये ओलावा राहणार असून गहू, चण्यासारख्या पिकाला याचा फायदा होणार आहे, असे एका शेती तज्ज्ञाने सांगितले.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पाऊस ऑक्टोबर मध्य गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी