राष्ट्रीय

Rajsthan Assembly Elections 2023 : 'या' कारणामुळे बदलली राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार आता राजस्थान विधानसभेच्या निवडणुका या २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरला पार पडणार आहेत.

नवशक्ती Web Desk

दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांची घोषणा केली होती. आयोगाने केलेल्या घोषणेनुसार राजस्थान राज्यात २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होतं. पण आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. असं असलं तरी निकाल मात्र ठरलेल्या दिवशी म्हणजे २ डिसेंबर रोजीच जाहीर होणार आहे.

'या' कारणामुळे बदलली तारीख

केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदन जाहीर करत तारीख पुढे ढकलण्याचं कारण सांगितलं आहे. यात निवेदनात म्हटलं आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजित संघटना आणि माध्यमांनी उपस्थित केलेल्या विषयाला हा बदल करण्यात आला आहे.

आयोगाने निश्चित केलेल्या तारखेला म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानात लग्नाचे मुहूर्त असल्यानं या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक लग्र समारंभात व्यस्त असणार आहेत. तसंच यामुळं वाहतुकीची देखील समस्या निर्माण होऊ शकते. याचा परिणाम मतदानावर होऊन मतदान घटण्याची शक्यता आहे. यामुळे हे मतदान २३ ऐवजी २५ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

राजस्थान विधानसभेचं सुधारित वेळापत्रक

राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख - ३० ऑक्टोबर २०२३(सोमवार)

नामांकन करण्याची शेवटची तारीख - ६ नोव्हेंबर २०२३ (सोमवार)

नामांकन छानणीची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ (मंगळवार)

माघार घेण्याची शेवटची तारीख - ९ नोव्हेंबर २०२३ (गुरुवार)

मतदानाची तारीख - २५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार)

मतमोजणीची तारीख - ३ डिसेंबर २०२३ (रविवार)

निवडणूक पूर्ण होण्याची तारीख - ५ डिसेंबर २०२३ (मंगळवार)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी