राष्ट्रीय

Red Fort Blast : "असं वाटलं जमीन फाटली, रस्त्यावर शरीराचे तुकडे पडले होते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भीषणता

स्फोट इतका भीषण होता, की लोकांच्या शरीराचे तुकडे अक्षरश: रस्त्यावर पडले. या स्फोटाची दाहकता प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.

नेहा जाधव - तांबे

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण दिल्ली हादरली. दिल्लीतील या भीषण स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नसून सुरक्षा यंत्रणा प्रत्येक बाजूने या घटनेचा तपास करत आहे. हा स्फोट सोमवारी संध्याकाळी ६ ते ६.४५ दरम्यान घडला. स्फोट इतका भीषण होता, की लोकांच्या शरीराचे तुकडे अक्षरश: रस्त्यावर पडले. या स्फोटाची दाहकता प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.

ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की "मी इथून दूर उभा होतो. सर्वात आधी आम्ही रस्त्यावर फुफ्फुस पडलेलं पाहिलं. आम्ही पोलिसांना सांगितले. आम्हाला वाटलं असंच मांस पडलं असेल. पण, जेव्हा आम्ही हात पाहिला. तेव्हा आम्ही घाबरलो. मी ते शब्दात सांगू शकत नाही"

तर दुसऱ्या एका तरुणाने सांगितले, की "मी दुकानात बसलो होतो अचानक मोठा आवाज झाला. धमाका झाला. मी अक्षरश: जमिनीवर कोसळलो. स्फोट इतका भीषण होता, की मी उठता उठता तीनदा पडलो. माझे पाय अजूनही थरथरत आहेत. जणू काही जमीन फाटली असं वाटलं."

"मी माझ्या घरातून आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि नंतर काय झाले ते पाहण्यासाठी खाली आलो. मी जवळच राहतो, इतका मोठा स्फोट झाला की इमारत हादरली" असे स्थानिक रहिवासी राजधर पांडे यांनी सांगितले.

एका कारमध्ये अचानक स्फोट

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. बाजूला पार्क असलेल्या इतर ३-४ वाहनांनाही आग लागली. तर, स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. दिल्लीसह मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश कोलकातामध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून तपास सुरू आहे.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी