राष्ट्रीय

टाटा मोटर्सच्या याचिकेवरील निकाल राखीव

वृत्तसंस्था

बेस्टने १४०० इलेक्िट्रक बस खरेदीतून अपात्र ठरवल्याबद्दल टाटा मोटर्स कंपनीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला आहे.

बेस्टच्या इलेक्िट्रक बस खरेदीच्या निवीदा प्रक्रियेत टाटा मोटर्सने सहभाग घेतला होता. मात्र, तांत्रिक कारणाने बेस्टने टाटा मोटर्सला अपात्र ठरवले. या घटनेनंतर टाटा मोटर्सने गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टात धाव घेऊन बेस्टच्या अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. निविदा जिंकणाऱ्या कंपनीसाठी टाटा मोटर्सची तांत्रिक निविदा मनमानी पद्धतीने रद्द केल्याचा आरोप कंपनीने न्यायालयात केला. मात्र, बेस्टने कंपनीचे आरोप फेटाळून लावले. सर्व योग्य प्रक्रिया राबवूनच कंत्राट दिल्याचे सांगितले. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, बेस्टने २६ फेब्रुवारी २०२२ ला ई-टेंडर नोटीस दिली. यात १४०० सिंगल डेकर एसी इलेक्िट्रक बसेसची मागणी केली होती. टाटा मोटर्सने २५ एप्रिल रोजी तांत्रिक व आर्थिक निविदा दाखल केली. मात्र, ६ मे रोजी बेस्टने तांत्रिक मूल्यांकन प्रसिद्ध केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत