‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता X @RanaBharatiye
राष्ट्रीय

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता

लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य, परंतु विरोधी किंवा अल्पसंख्याक बाजूचा आवाज दडपून टाकणारा 'बहुसंख्याकवाद' हा लोकशाहीसाठी घातक आहे, असा इशारा न्या. गुप्ता यांनी दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशातील न्यायव्यवस्था बहुसंख्याकवादाकडे वाटचाल करत असून मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यात न्यायालये अपयशी ठरत आहेत, अशी चिंता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.

लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य, परंतु विरोधी किंवा अल्पसंख्याक बाजूचा आवाज दडपून टाकणारा 'बहुसंख्याकवाद' हा लोकशाहीसाठी घातक आहे, असा इशारा न्या. गुप्ता यांनी दिला. सर्वच स्तरांवरील न्यायालये आता या बहुसंख्याकवादाकडे झुकताना दिसत आहेत. राम जन्मभूमी प्रकरणात ऐतिहासिक निकाल देताना भविष्यात प्रार्थनास्थळांविषयीचे इतर कोणतेही विवाद उकरून काढले जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र, त्यानंतर ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी देऊन स्वतःच्याच भूमिकेशी विसंगत पाऊल उचलले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा