जंतरमंतरऐवजी पर्यायी जागेचा शोध 
राष्ट्रीय

जंतरमंतरऐवजी पर्यायी जागेचा शोध

दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक 'जंतरमंतर' हे आता आंदोलनांसाठी योग्य ठिकाण राहिलेले नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या एका जनहित याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक 'जंतरमंतर' हे आता आंदोलनांसाठी योग्य ठिकाण राहिलेले नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या एका जनहित याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली आहे.

जंतरमंतरवरील निदर्शनांमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जोयमाल्या बागची तसेच न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सतीश चंद कौशिक यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर केंद्र सरकार आणि इतर संबंधितांना नोटीस बजावली आहे.

यासंदर्भात प्रशासनाकडून आवश्यक निर्देश घेण्याचे निर्देश खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग