राष्ट्रीय

दोन ट्रक आणि खासगी बसमध्ये भीषण टक्कर, अपघातात सात ठार, १५ जखमी

Swapnil S

मुसुनुरू (आंध्र प्रदेश) : नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरू येथे शनिवारी पहाटे दोन ट्रक आणि एका खासगी बस यांच्या झालेल्या भीषण टकरीत मरण पावलेल्यांची संख्या सातवर गेली आहे. तर, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. श्रीकालहस्ती येथे जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला लोखंडी वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. याचवेळी लोखंडी ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला धडक दिली, असे कवळीचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकट रमणा यांनी सांगितले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी तिघांचा नेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. या संबंधात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा

गाझात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची निवडणूक पुढे ढकलली