राष्ट्रीय

सेक्सटोर्शनमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम ; सायबर पोलिसांकडून पीडितांचे समुपदेशन

व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे बहुतांशी दिसून आले आहे. अशा व्यक्ती सतत तणावाखाली असतात. शिवाय यातून काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात

प्रतिनिधी

सेक्सटोर्शनच्या नावाखाली मागितल्या जाणाऱ्या खंडणीमुळे अनेकजण हैराण झाले आहेत. या सेक्सटोर्शनमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलीस आता पीडितांना मदतीचा हात देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सेक्सटोर्शन खंडणीचा कॉल आल्यास घाबरू नका, असे आवाहन सायबर पोलिस करत आहेत.

सायबर पोलिसांकडून खंडणी पीडितांचे समुपदेशन केले जात आहे. अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यानंतर स्क्रीनवर एक महिला काही वेळ नग्न अवस्थेत दिसते. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितांकडून पैसे उकळले जातात. काहीजण या प्रकाराला घाबरून मागतील तशी खंडणी देतात. तर, काही लोक खंडणीचे फोन नंबर ब्लॉक करतात. मात्र लैंगिक शोषणाची धमकी गांभीर्याने घेणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे बहुतांशी दिसून आले आहे. अशा व्यक्ती सतत तणावाखाली असतात. शिवाय यातून काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.

महाराष्ट्रातील 229 देहविक्रीची प्रकरणे या वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 229 लैंगिक शोषणाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पोलिस ऑनलाइन पोर्टलवर सुमारे 2002 लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण 172 जणांना अटक केली आहे. यातील बरेचसे आरोपी हे परराज्यातील आहेत. 

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद