राष्ट्रीय

शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण

वृत्तसंस्था

शिवाजी पार्क म्हटले की, शिवसेना हेच समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. तसेच कारण नसतानाही भाजपने संजय राऊतांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू असतानाच शरद पवार यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेदेखील घेऊ शकतात. शिंदे गटाने मेळाव्यासाठी बीकेसीचे मैदान मागितले होते. त्यांना हे एमएमआरडीएचे मैदान मिळाले आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही. शिवसेनेलाही परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेलाही शिवाजी पार्कचे मैदान मिळण्यात हरकत नाही.”

राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर कुणाला परवानगी हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच शिंदे गटाने ‘एमएमआरडीए’कडे बीकेसी मैदानासाठी अर्ज केला होता. तो स्वीकारण्यात आला आहे, तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते मैदान आरक्षित असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

२०२४मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले, “एकत्रित काहीतरी करावे, अशी सर्वांची इच्छा आहे; मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेले नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत त्यांची मते मांडली आहेत; मात्र अद्याप त्याचे निर्णयात रूपांतर झालेले नाही.” काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर