राष्ट्रीय

Video : खतरनाक! ५ फूटांचा नाग, स्कूटरवर बसणाऱ्या व्यक्तिची पाहत होता वाट, पाहा कसं केलं रेस्क्यू?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक सर्पमित्र प्लेजर स्कूटरमध्ये अडकलेल्या एका नागाला रेस्क्यू करताना दिसत आहे.

Suraj Sakunde

देशभरात अनेक भागांमध्ये कडक गरमी पडलेली आहे. त्यामुळं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही त्रास होत आहे. अलीकडेच याचं एक उदाहरण पाहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक भला मोठा नाग स्कूटीमध्ये लपल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्लेजर स्कूटरमध्ये अडकलेल्या एका नागाला एक सर्पमित्र रेस्क्यू करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये साप स्कूटीच्या हेडलाईटच्या कव्हरमधून काढला जात असल्याचं दिसत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नागाला स्कूटीमधून बाहेर काढला जात असताना नाग चवताळल्याचं दिसत आहे. तो कित्येकवेळा स्कूटीच्या हँडलवर चावा घेताना दिसत आहे. राजेश इंदोरी या सर्पमित्रानं हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला स्कूटरचं खोललेलं फ्रंट पॅनल दिसत असून त्यानंतर नागाला पकडल्याचं दिसत आहे. त्यानंतर नाग हेडलाईट कव्हरमध्ये घुसल्याचं आपला पाहता येईल. त्यानंतर नागाला बाहेर काढण्यासाठी हेडलाईट कव्हर ढिलं केलं जात आहे.

यादरम्यान साप चवताळल्याचं दिसत असून तो चावा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. शेवटी सर्पमित्र यशस्वीरित्या नागाला बाहेर काढतो. गरमीपासून बचावासाठी साप स्कूटीमध्ये घुसल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर एका अनुभवी सर्पमित्रानं त्याला बाहेर काढलं.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा