ANI
राष्ट्रीय

Sonia Gandhi ED : सोनिया गांधी २१ जुलैला ED ला सामोरे जाणार ?

याआधी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले

वृत्तसंस्था

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केली होती. याआधी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला. जो 22 जुलै रोजी संपत आहे.

ईडीने राहुल गांधींची चार दिवस चौकशी केली. प्रियांका गांधीही राहुलसोबत ईडी कार्यालयात गेल्या होत्या. ईडीकडून राहुलच्या सुरू असलेल्या चौकशीला काँग्रेसने विरोध केला होता. खासदार राहुल गांधी यांना अशा प्रकारे त्रास देता येणार नाही, असे काँग्रेसने त्यावेळी म्हटले होते.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट