राष्ट्रीय

Sonia Gandhi : भारत जोडो यात्रेनंतर सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास थांबणार ?

वृत्तसंस्था

गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी हे संकेत दिले. भारत जोडो यात्रेने आपला राजकीय प्रवास थांबू शकतो, असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रायपूर येथील अधिवेशनात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना, सोनिया गांधी म्हणाल्या, "2004 आणि 2009 मधील माझा विजय आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझा प्रवास होता. भारत जोडो यात्रा." हा प्रवास काँग्रेससाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

भारतातील जनतेला शांतता, सहिष्णुता आणि समता हवी आहे, हे सिद्ध झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगले सरकार दिले. काँग्रेसने देशात लोकशाही मजबूत केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रवास यशस्वी झाल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून नष्ट केली आहे. त्यांनी काही उद्योगपतींना फायदा करून देत देशाला आर्थिक संकटात ढकलले आहे.भाजप द्वेष पसरवत अल्पसंख्याक,महिला,दलित,आदिवासी यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या सत्तेला खंबीरपणे सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

एच. डी. रेवण्णा एसआयटीच्या ताब्यात,राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र!