राष्ट्रीय

'स्टारलिंक'चे भारतात दरमहा ८,६०० रुपयांमध्ये अमर्याद इंटरनेट; कंपनीने जारी केल्या किंमती; कधी पासून सुरू होणार सेवा?

एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने भारतातील त्यांच्या ‘स्टारलिंक’ सॅटेलाइट इंटरनेट सेवा ‘प्लॅन’च्या किमती सोमवारी जाहीर केल्या. निवासी प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दरमहा ८,६०० रुपये द्यावे लागतील. तसेच, हार्डवेअर म्हणून एक सॅटेलाइट डिश किट घ्यावी लागणार असून त्याची किंमत ३४,००० रुपयेआहे.

Swapnil S

मुंबई : एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने भारतातील त्यांच्या ‘स्टारलिंक’ सॅटेलाइट इंटरनेट सेवा ‘प्लॅन’च्या किमती सोमवारी जाहीर केल्या. निवासी प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दरमहा ८,६०० रुपये द्यावे लागतील. तसेच, हार्डवेअर म्हणून एक सॅटेलाइट डिश किट घ्यावी लागणार असून त्याची किंमत ३४,००० रुपयेआहे.

कधी पासून सुरू होणार सेवा?

वापरकर्त्यांना पहिल्या ३० दिवसांच्या ट्रायलची संधी मिळणार असून जर ते समाधानी नसतील तर पूर्ण पैसे परत केले जाणार आहेत. ही सेवा जानेवारी २०२६ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाल्याने अमर्यादित डेटासह ९९.९% अपटाइम मिळणार असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी ते गेम चेंजर ठरणार आहे.

‘स्टारलिंक’ हा ‘स्पेसएक्स’चा एक प्रकल्प असून, तो उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवतो. ‘स्पेसएक्स’चे उपग्रह पृथ्वीच्या जवळून फिरतात, त्यामुळे इंटरनेट वेगवान आणि सुरळीत चालते. यामुळे दुर्गम व डोंगराळ भागात इंटरनेट सेवा पुरवणे शक्य होणार आहे. सध्या दुर्गम भागात इंटरनेट नीट चालत नसल्याची अनेकांची तक्रार आहे, ती सॅटेलाइट इंटरनेट सेवेमुळे दूर होणार आहे.

सॅटेलाइटद्वारे पृथ्वीच्या कोणत्याही भागातून बीम इंटरनेट कव्हरेज शक्य होणार आहे. उपग्रहाच्या नेटवर्कमुळे वापरकर्त्यांना हाय-स्पीड, कमी-लेटेंसी इंटरनेट कव्हरेज मिळणार आहे.

‘स्टारलिंक किट’मध्ये स्टारलिंक डिश, एक वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय केबल्स आणि माउंटिंग ट्रायपॉड असून, हाय-स्पीड इंटरनेटसाठी डिश मोकळ्या आकाशाखाली ठेवावी लागेल. आयओएस आणि अँड्रॉइडवर स्टारलिंकचे ॲप उपलब्ध असून, ते सेटअपपासून मॉनिटरिंगपर्यंत सर्व काही करते. ‘स्टारलिंक’ने म्हटले आहे की, त्यांचे उपकरण सेट अप करणे सोपे आहे आणि ते सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकते.

सॅटेलाइट इंटरनेट सेवेत काय मिळणार?

  • डाउनलोड स्पीड - ४०-२२०+ Mbps

  • अपलोड स्पीड- ८-२५+ Mbps

  • लेटेंसी - २०-६० ms

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश