कोळसा खाण प्रकरण : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना क्लिन चीट x
राष्ट्रीय

कोळसा खाण प्रकरण : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना क्लिन चीट

कोळसा खाण वाटप प्रकरणाशी संबंधित एका गुन्हेगारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविरोधातील खटला औपचारिकपणे बंद केला.

Swapnil S

नवी दिल्ली : कोळसा खाण वाटप प्रकरणाशी संबंधित एका गुन्हेगारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविरोधातील खटला औपचारिकपणे बंद केला. या प्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेला समन्सचा (हजेरीचा) आदेशही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

सरन्यायाधीश सूर्य कांत व अन्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत माजी पंतप्रधानांना या प्रकरणातून क्लीन चिट दिली. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रकरण बंद करण्याबाबतचा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला होता. असे करण्याचे कोणतेही सबळ कारण नव्हते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग