प्रबीर पुरकायस्थ, संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

अटक, कोठडी बेकायदेशीर! 'न्यूजक्लिक'च्या संस्थापकांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश

‘न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना दहशतवादविरोधी कायद्यान्वये झालेली अटक अवैध असल्याचे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आणि...

Swapnil S

नवी दिल्ली : ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना दहशतवादविरोधी कायद्यान्वये झालेली अटक अवैध असल्याचे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आणि त्यांची कोठडीतून सुटका करण्याचे आदेश दिले. न्या. भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या पीठाने हा आदेश दिला.

भारताच्या सार्वभौमत्वात अडथळे निर्माण करून देशाविरुद्ध असंतोष पसरविण्यासाठी ‘न्यूजक्लिक’ या न्यूज पोर्टलला चीनकडून मोठा निधी मिळाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. ‘पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रॅसी ॲण्ड सेक्युलॅरिझम’ (पीएडीएस) या गटाशी संगनमत करून २०१९च्या निवडणूक प्रक्रियेत घातपात घडवून आणण्यासाठी पुरकायस्थ यांनी कारस्थान रचल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

अटक-कोठडी बेकायदेशीर

आता सर्वोच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतर त्यांना झालेली कोठडी बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. रिमांडपूर्वी अटकेचे कारण त्यांना किंवा त्यांच्या वकिलांना सांगितले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या (यूएपीए) विविध कलमांअंतर्गत प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गेल्या वर्षी पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांकडून अटक झाली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी