राष्ट्रीय

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाचा दिलासा; 'या' तारखेपर्यंत वाढवला जामीन

प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने मोदी मानहानी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी आज स्वतः राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात जाऊन झालेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली.

यानंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. मानहाणीच्या प्रकरणात त्यांना १५ हजारच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. तसेच १३ एप्रिलपर्यंत त्यांच्या जामीनात वाढ करण्यात आली आहे. तर, या संदर्भातील पुढील सुनावणी ही ३ मेला होणार आहे.

दरम्यान, मानहानीचा प्रकरणावर १३ एप्रिलला पुढील सुनवाई होणार आहे. तर, ३ एप्रिलला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना ३० दिवसांचा वेळ दिला होता.

त्यानुसार त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता त्यांचा जामीन १३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, आता आगामी काळामध्ये त्यांच्या खासदारकीचे काय होते? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त