राष्ट्रीय

अभिनेता थलपती विजयने स्थापन केला स्वत:चा पक्ष

तामिळनाडूत आणखी एका चित्रपट कलाकाराने राजकारणात प्रवेश केला असून थेट स्वत:चा पक्षच स्थापन केला आहे.

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडूत आणखी एका चित्रपट कलाकाराने राजकारणात प्रवेश केला असून थेट स्वत:चा पक्षच स्थापन केला आहे. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय अर्थात जोसेफ विजय चंद्रशेखर याने लोकसभा निवडणुकीपूर्वी 'तमिलागा वेत्री कझम' अर्थात तामिळनाडू विजय पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आहे.

अभिनेता विजय २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. विजय म्हणाला की, आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे. चित्रपटात काम करत राहीन, पण राजकारणात येऊन तामिळनाडूच्या जनतेची सेवा करणार असल्याचेही विजयने सांगितले. विजयचे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर १०.५ दशलक्ष आणि ट्विटरवर ४.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा गरजू लोकांना मदत करताना दिसतो. विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे. त्याने आगामी 'थलपथी ६५' या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे. विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे कॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी विजयने नलय्या थेरपू या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे नाव विजय होते. या नावाने त्याने ८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल