राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा दहशतवादी हल्ला टळला,कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था

बिहार पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी पाटण्यात केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी एकजण माजी पोलीस अधिकारी आहे. भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट दहशतवाद्यांकडून रचला जात होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांचे १५ दिवसांचे प्रशिक्षण फुलवारी शरिफ येथे झाले. त्यांनी ६ व ७ जुलैला घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींवर १२ जुलैच्या दौऱ्यात हल्ला करण्याचा कट रचला. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून काही कागदपत्रे मिळाली. यात ‘२०४७ पर्यंत भारत एक इस्लामिक राष्ट्र’ नावाचे कागदपत्र सापडले. याशिवाय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) २५ पॅम्प्लेटही हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, ‘पीएफआय’ने मात्र पोलिसांनी जप्त केलेली पॅम्प्लेट आम्ही प्रकाशित केली नसल्याचे म्हटले आहे. तसेच दहशतवादी कृत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

पाक, बांगलादेश,

तुर्कीमधून पैशांचा पुरवठा

फुलवारी शरिफ येथे भेट देणाऱ्या आणि दहशतवादी हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये बहुसंख्य युवक उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथून आल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तान, बांगलादेशव तुर्कीसारख्या मुस्लीम देशांमधून पैसे मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, अटक केलेल्या आरोपींपैकी एक जण माजी पोलीस अधिकारी आहे. आरोपी मोहम्मद जलालुद्दीन झारखंड पोलीस विभागातील माजी अधिकारी आहे. नुपूर शर्मासह इस्लामविरोधात बोलणाऱ्यांची यादी दहशतवाद्यांनी तयार केली होती. राजस्थानातील उदयपूर आणि महाराष्ट्रात अमरावतीत झालेल्या प्रकरणांसारखा बदला घेण्याची योजना त्यांनी आखली होती.

अतहरने पोलिसांना सांगितले की, या मोहिमेत २६ जणांचा सहभाग होता, ज्यांचे प्रशिक्षण पाटणा येथे सुरू होते. हे सर्व लोक पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘पीएफआय’ आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ‘एसडीपीआय’शी संबंधित होते. पोलिसांना ७ पानी कागदपत्र मिळाले आहे. त्यात संपूर्ण नियोजनाचा उल्लेख आहे. पाटणा येथील फुलवारी शरीफच्या अहमद पॅलेसच्या दुसऱ्या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये बिहारच्या बाहेरचे लोकही येत होते. २००१, २००३ आणि २०१३ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये अतहर बेलरचा सहभाग असल्याची माहितीही एएसपीने दिली. याची खातरजमा पोलिसांनी केली आहे.

भाजपला सत्ता पुन्हा कशासाठी हवीय?

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...