राष्ट्रीय

अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने वार करुन नंतर दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला अटक

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवशक्ती Web Desk

अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने 30 ते 40 वेळा वार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी (28 मे) रात्री दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे.

रविवारी रात्री दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात एका प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने 30-40 वेळा वार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अल्पवयीन मुलगी ही दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील जे.जे. कॉलनीमधील रहिवासी होती. मृत पीडिता ही रस्त्याने जात असताना आरोपीने तिला हटकून तिच्यावर हल्ला केला. आरोपी साहिल आणि मृत मुलगी यांची आधिपासून ओळख होती. ते नेमकं किती वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते, याबाबत माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यात शनिवारी वाद झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अल्पवयीन मुलगी रविवारी ओळखीतील मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात गाठून तिची निर्दयीपणे हत्या केली. यानंतर मृत मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दिल्लीतील शाहबाद पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी देखील या प्रकरणातील गांभिर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला, तसेच चौकशीसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली.

महिला आयोगाने घेतली दखल

या धक्कादायक प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती माहिवाल यांनी अशी हादरुन सोडणारी घटना यापुर्वी बघीतली नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दिल्लीत मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आला असून पुन्हा कोणीही अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावणार नाही, असे बदल पोलीस व्यवस्थेत करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी