राष्ट्रीय

पुढील हंगामात साखर निर्यातीवर सरकार मर्यादा घालणार

माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे

वृत्तसंस्था

सरकार पुढील हंगामात साखर निर्यातीवर ६०-७० दशलक्ष टनांची मर्यादा घालू शकते. चालू हंगामात १० दशलक्ष टन आहे. साखर निर्यातीवर मर्यादा घालण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. पुढील हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असेल.

या माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. चालू हंगामाच्या तुलनेत पुढील हंगामात एक तृतीयांश कमी निर्यात होऊ शकते, असे सरकारी आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.

२४ मे रोजी सरकारने सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर मर्यादा घातली. या वर्षातील विक्रमी निर्यातीमुळे १ ऑक्टोबरपर्यंत साखरेचा साठा ६५ लाख टनांवर येऊ शकतो. वर्षभरापूर्वी ते ८२ लाख टन होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सरकारला किमान आठ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. कारण यावर्षी ३६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली