राष्ट्रीय

अत्याचार करण्यात तृणमूलने माकपला मागे टाकले, ममता बॅनर्जींवर भाजपचा आरोप

Swapnil S

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पश्चिम बंगालमधील लोकांवर अत्याचार करण्यात पूर्वीच्या माकपच्या सरकारला मागे टाकले आहे, असा दावा भाजपने बुधवारी केला आणि लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणणूल काँग्रेसला जनता चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथे महिलांच्या कथित लैंगिक छळाचा मुद्दा उपस्थित करून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशकर प्रसाद यांनी काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीतील इतर घटकांवर टीका केली आणि या प्रकरणावरील त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केले.

संदेशखळीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पेटंट हल्ला, अपमानास्पद वागणूक, महिलांवरील लैंगिक अत्याचार हे आपल्या समाजासाठी आणि लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे, असे प्रसाद यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रसाद यांनी रश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यातील अशा घटनांचा "बचाव" केल्याबद्दल निंदा केली, त्यांच्या विवेकबुद्धीवर आणि इतर विरोधी पक्षांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले की, ममता बॅनर्जी जेव्हा पूर्वी माकपच्या अत्याचाराविरुद्ध लढल्या आणि त्याविरोधात अनिश्चित काळासाठी आंदोलनाला बसल्या, तेव्हा आपण सगळेच त्यांचे चाहते झालो होतो.

Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं, १०-१५ जण राजावाडी रुग्णालयात भरती

Video : मतदान केंद्रावरच भिडले आमदार आणि मतदार, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान; मतदान न करताच फिरावं लागलं माघारी

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

कल मतदारसंघाचा : ईशान्य मुंबईत अटीतटीची लढत; मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांचा कस लागणार