राष्ट्रीय

सप्टेंबर महिन्यापासून स्पेनमध्ये रेल्वे प्रवास होणार मोफत

प्रादेशिक लाइन्स वर धावतील त्यांना १ सप्टेंबर ते ३२ डिसेंबर पर्यंत विनामुल्य प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

वृत्तसंस्था

महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी बहुतांश देशातील सरकार अपयशी ठरू लागले आहे. तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्यापासून स्पेन सरकारच्या वतीने काही ट्रेनमध्ये लोकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी घोषित केले की, राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर रेन्फेकडून ३०० किमी पेक्षा कमी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या Cercanías आणि Rodalies आणि प्रादेशिक लाइन्स (प्रादेशिक लाइन्स) वर धावतील त्यांना १ सप्टेंबर ते ३२ डिसेंबर पर्यंत विनामुल्य प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये सिंगल ट्रॅव्हल्स तिकीट किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा समावेश नाही. स्पॅनिश रेल्वेवर १०० टक्के सवलत फक्त बहु प्रवास तिकीटांवर असेल. लांब पल्ल्याच्या प्रवासात आणि इतर कंपन्यांच्या प्रवासी सेवेवर कोणतीही सूट मिळणार नाही.

पर्यावरण, पैशाची बचत होईल

स्पेनच्या परिवहन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे देशाच्या इंधन ऊर्जेची बचत होईल. किमतींमध्ये सतत होणारी वाढ दिवसाच्या मध्यभागी दैनंदिन कार्यालय किंवा इतर कामे हाताळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करेल.

जर्मनीत ८०० रू. मासिक प्रवास

केवळ स्पेनच नाही, तर युरोपीयन देशांमध्ये अनेक देश आहेत. ज्यांनी अशा योजना लोकांसमोर आणल्या आहेत. गेल्या महिन्यात, जर्मनीने सुमारे १० डॉलर किंवा ८०० रूपयांची अमर्यादित मासिक प्रवास तिकीटे लॉंच केली. ज्याचा विचार स्थानिक वाहतुकीवर देशभर फिरण्यासाठी केला जाऊ शकतो. हा करार सरकारच्या ऊर्जा-बचत पॅकेजचा एक भाग आहे. जो ऑगस्टच्या अखेरपर्यंत चालणार आहे.

ऑस्ट्रियाने सुरू केली सेवा

ऑस्ट्रियाने २०२१च्या शेवटी त्याचे ‘क्लिमाटिकेट’ (हवामान मुद्रांक) लाँच केले. लोकांना त्यांच्या गाड्या सोडून देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे डिझाइन करण्यात आले होते. ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. जेव्हा तिकीटांची विक्री सुरू झाली तेव्हा बेवसाई़डवर लोड आल्याने अखेर बंद झाली. वार्षिक पास, ज्याची किंमत १,०९५ युरो (अंदाजे ८९,३४१ रुपये) आहे. दर आठवड्याला फक्त २१ युरो (अंदाजे रु. १७१३) किंवा ३ युरो (२४४) प्रति दिन आहे.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव