राष्ट्रीय

Video : किराणा दुकानदाराचे अश्लील चाळे; तरुणीला केला 'नको तिथे स्पर्श', भडकलेल्या मुलीने चप्पल काढली अन्...

किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या मुलीला वृद्ध दुकानदाराने केला 'नको तिथे स्पर्श'...

Swapnil S

केरळच्या त्रिशूरमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीला वृद्ध दुकानदाराने नको तिथे स्पर्श केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणीने दुकानात घुसून त्या वृद्धाला चप्पलेने मारहाण केली.

माहितीनुसार, ही घटना त्रिशूर मेडिकल कॉलेजजवळील किराणा दुकानात घडली. अली असे वृद्धाचे नाव असून तो त्रिशूर मेडिकल कॉलेजजवळ किराणा दुकान चालवतो. ही मुलगी दुकानात काही सामान खरेदी करण्यासाठी आली असता वृद्धाने तिला नको तिथे स्पर्श केल्याचा आरोप आहे.

व्हिडिओमध्ये तरुणी वृद्धाला शिवीगाळ करताना दिसते. तिथे उपस्थित दुसऱ्या तरुणीसह ती दुकानात घुसून त्याला चप्पलेने मारहाण करते. हा दुकानदार नेहमीच मुलींचा विनाकारण हात पकडतो, असे दुसरी तरुणी जोरात ओरडतून सांगते. त्यानंतर दुकानदार माफी मागत पोलिस तक्रार न करण्याची विनंती करतो. पण, अश्लील चाळे केल्यानंतर फक्त माफी मागून उपयोग नाही, असे म्हणत आणि त्याच्या थोबाडीत चप्पला मारत तरुणी तक्रार दाखल करणारच असे सांगते.

तथापि, या घटनेचा व्हिडिओ गुरुवारपासून (४ जानेवारी) इंटरनेटवर व्हायरल झाला असला तरी अद्याप तरुणीने तक्रार केली की नाही हे मात्र समजू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनीही कोणती कारवाई केल्याचे वृत्त नाही. पण, नेटकरी व्हिडिओखाली संतप्त प्रतिक्रिया देत असून कठोर कारवाईची मागणी करीत आहेत.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली