ANI
राष्ट्रीय

एमएसपीसाठी सरकारवर दबाव टाकणार - राहुल गांधी

सरकारवर दबाव आणून इंडिया आघाडी शेतकऱ्यांना किमान आधारभूत भावाची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळवून देईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे संसदेच्या संकुलात शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : सरकारवर दबाव आणून इंडिया आघाडी शेतकऱ्यांना किमान आधारभूत भावाची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळवून देईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे संसदेच्या संकुलात शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सांगितले.

पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत अवगत केले. आम्ही या बाबत इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करू आणि शेतकऱ्यांना कायदेशीर हमी मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकू, असे राहुल गांधी यांनी वार्ताहरांना सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी