राष्ट्रीय

यमुना पुन्हा धोक्याच्या पातळीबाहेर

जनतेने यमुनेच्या किनारी येऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीबाहेर वाहू लागल्याने दिल्लीकर हादरले आहेत. दरम्यान, येते सहा दिवस दिल्लीत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दिल्लीतील जुना यमुना पुलावर पाण्याची पातळी २०५.७५ मीटर होती, तर यमुनेची धोक्याची पातळी २०५.३३ मीटर आहे.

हरियाणाच्या हथिनीकुंड धरणातून यमुना नदीत लाखो क्युसेस पाणी सोडण्यात आले. त्यामुळे दिल्लीत पुराचे सावट पसरले आहे. अधिकारी व जनता यामुळे घाबरली आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणात ॲलर्ट घोषित केला आहे. तीन सरकारनी यमुनेच्या सर्व चौक्यांवर टेहळणी वाढवली आहे. विशेषत: दिल्लीत मोठा धोका आहे. कारण दिल्लीत अनेक भाग हे सखल आहेत. पाण्याची पातळी वाढताच ते पाणी शहरात घुसते. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातून लोक अजूनही बाहेर आलेले नाहीत. त्यात पुन्हा पाणी भरू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जनतेने यमुनेच्या किनारी येऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शहरात बोटीतून गस्त घातली जात आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ; जमीन भाड्याने देण्याचा मार्ग मोकळा