आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू 
राष्ट्रीय

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांचा वाढता खर्च भागवण्यासाठी निधी वळवला जात असल्याने माहिती तंत्रज्ञान उद्योग आता नवीन नोकऱ्या निर्माण करत नाही आहे, असे जोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य शास्त्रज्ञ श्रीधर वेम्बू यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांचा वाढता खर्च भागवण्यासाठी निधी वळवला जात असल्याने माहिती तंत्रज्ञान उद्योग आता नवीन नोकऱ्या निर्माण करत नाही आहे, असे जोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य शास्त्रज्ञ श्रीधर वेम्बू यांनी रविवारी सांगितले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टमध्ये वेम्बू यांनी नमूद केले की, जोहोसह आयटी उद्योगाने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचे पाऊल उचलणे टाळले असले तरी, गेल्या काही वर्षांत नवीन रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण करण्यात तो अपयशी ठरला आहे.

जो पैसा नवीन कर्मचाऱ्यांवर खर्च झाला असता, तो आता एआय आणि डेटा सेंटरच्या खर्चाकडे जात आहे. सर्व्हर आणि मेमरीच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे डेटा सेंटरचा खर्च वाढला आहे, असे वेम्बू म्हणाले. कंपनी या खर्चांचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असली, तरी अनेक घटक त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या वातावरणात सॉफ्टवेअरचे उत्पादन वाढवण्याच्या गरजेवर वेम्बू यांनी प्रश्न उपस्थित केला. एआयमुळे आपल्याला अधिक सॉफ्टवेअर वेगाने बनवणे शक्य होत असले, तरी आधीच अति-संपृक्त असलेल्या जागतिक सॉफ्टवेअर बाजाराला आणखी जास्त सॉफ्टवेअरची खरोखर गरज आहे का? असा सवाल त्यांनी केला.

कोणत्याही वस्तू किंवा उत्पादन उद्योगाप्रमाणेच, आता या क्षेत्राचे लक्ष गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ब्रँडकडे वळत असून, यामुळे या क्षेत्राची वाढ अतिशय मंद गतीने होईल, असे त्यांनी नमूद केले.

जोहोच्या संस्थापकांनी हेदेखील निदर्शनास आणून दिले की, कॉर्पोरेट ग्राहक आपला आयटीवरील खर्च एआय तंत्रज्ञानाकडे वळवत आहेत. सध्या कर्ज घेऊन भांडवली खर्चावर प्रचंड पैसे उधळणाऱ्या एआय कंपन्यांना यातून किती आर्थिक परतावा मिळेल, याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका