नवी मुंबई

रस्ते अपघातातील मृत्यूत १७.७ टक्के घट

परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा उद्घाटन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पाडला.

Swapnil S

नवी मुंबई : राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनातर्फे मागील वर्षी ठरवण्यात आले होते. नवी मुंबई शहरातील मागील वर्षाच्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या ही १७.७ % टक्क्यांनी कमी झाली आहे. या उद्दिष्टात राज्यातील जिल्ह्यांमध्ये/विभागामध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा प्रथम आणि चंद्रपूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा उद्घाटन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पाडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नवी मुंबई शहरात पोलीस विभाग, महानगरपालिका, सिडको, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट (वारंवार अपघात होणारे) अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, तपासणी आणि अभ्यास करून, त्यातील त्रुटी शोधून काढून आवश्यक ते बदल करून अपघात संख्या कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई शहरातील मागील वर्षाच्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या ही १७.७ % टक्क्यांनी कमी झाली आहे. गत २०२३ या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंतची आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबई विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई परिसरातील रस्ते अपघात आणि मृत्यू संख्या कमी करण्यामध्ये नवी मुंबईतील पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि महापालिका या सर्व विभागांनी घेतलेले परिश्रमाचे शासनाने कौतुक केलेले आहे. सदर कार्यक्रमात परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग व मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ हे मान्यवर उपस्थित होते.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश