PM
नवी मुंबई

एनएमएमटी बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी बससेवा ठप्प

एक तास बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले.

Swapnil S

नवी मुंबई : खोपटे (उरण) येथे बस अपघातात एनएमएमटीच्या बसचालकाला मारहाण करून घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या निषेधार्थ श्रमिक सेनेने आज काही काळ काम बंद आंदोलन केले. त्यामुळे एक तास बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले.

जुईनगरवरून खोपटे कोपरोली मार्गावर जाणाऱ्या ३४ क्रमांकाच्या बसवरील चालकाचा खोपटे येथे ताबा सुटल्याने रस्त्यातील तीन दुचाकीस्वार आणि एक टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये खोपटा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोपटे येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून चालकाला मारहाण करत घटनास्थळी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल सात ते आठ तास ओलीस धरले होते.

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा

Mumbai : हम्बोल्ट पेंग्विन लवकरच म्हैसूरच्या प्रवासाला? प्राणी देवाणघेवाण प्रस्तावावर पालिकेचा विचार

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

नवी मुंबईकरांची पाण्यासाठी वणवण; तुर्भे ते खारघरपर्यंत पाणीटंचाईचे संकट! अधिक रहिवासी टँकरवर अवलंबून

Kanpur Hit-And-Run : थारची स्कूटरला जोरदार धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला चालक फरार, Video