नवी मुंबई

उरण नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत तयार; लवकरच उद्घाटन होणार

उरण नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारत, फूल मार्केट आणि समाज मंदिराचे लवकर उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संकेत उरण नगरपरिषदेकडून देण्यात आले आहेत.

राजकुमार भगत

राजकुमार भगत/ उरण

उरण नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारत, फूल मार्केट आणि समाज मंदिराचे लवकर उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संकेत उरण नगरपरिषदेकडून देण्यात आले आहेत. आचारसंहिता आणि विधिमंडळाचे अधिवेशन यामुळे या तीन इमारतींचे उद्घाटन काहीसे लांबणीवर पडले होते. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून ही विकासकामे करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

उरण नगरपरिषदेची अत्याधुनिक प्रशासकीय इमारत जवळजवळ पूर्ण झाली असून, येत्या महिन्याभरात या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या इमारतीचे जवळ-जवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून, फर्निचर आणि काही किरकोळ कामे वगळता ही सुसज्ज इमारत पूर्ण झाली आहे. ६.५० कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या इमारतीत कार्यालयाच्या फर्निचरचे काम सुरू असून, त्यासाठी ३.५० लाख खर्च करण्यात येणार आहेत.

५० कोटींहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या उरण नगरपरिषदेला आठ वर्षांत नियोजित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे कामगारांना पावसाळ्यात गळक्या छताखाली कामकाज करावे लागत आहे. उरण नगरपरिषदेचे कामकाज वाढले असून, सुसज्ज आणि प्रशस्त अशा जागेची आवश्यकता आहे. १८ व्या शतकातील उरण नगरपरिषदेने १५० पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. नागरीकरण वाढल्याने व्यवसाय आणि व्यवहारांतही वाढ झाली आहे. त्यामुळे या शहराचा कारभार हाकण्यासाठी अद्ययावत कार्यालयाची आवश्यकता होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी