नवी मुंबई

१४ महिन्यांच्या मुलीच्या श्वसनमार्गात अडकला शेंगदाणा

प्रतिनिधी

नवी मुंबईमधील अवघ्या १४ महिन्यांच्या मुलीच्या श्वसनमार्गात अडकलेला शेंगदाणा बाहेर काढण्यात नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमला यश मिळाले आहे. यासाठी त्यांनी केलेली रिजिड ब्रोन्कोस्कोपी तब्बल ३० मिनिटे सुरु होती. 

या लहान मुलीला जेव्हा अपोलो हॉस्पिटल्समध्ये आणण्यात आले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होते, एसपीओ२ ७०-७५टक्के होता आणि तिला हाय फ्लो नेजल कॅनूलावर १०० ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील ईआरमध्ये तिला तातडीने इन्ट्युबेट व व्हेन्टिलेट केले गेले आणि इमर्जन्सी ब्रोन्कोस्कोपी यशस्वीपणे करून तिचे प्राण वाचवले गेले. श्वास घेण्यात त्रास आणि घरघर अशा तक्रारींसह या लहानग्या मुलीला जवळपासच्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमध्ये भरती करण्यात आले होते, तिच्यावर एचआरएडी आणि एलआरटीए म्हणून उपचार करण्यात येत होते. तिची कोविड-१९ तपासणी देखील पॉझिटिव्ह आली होती; पण या सर्व उपचारांनंतर देखील तिला होत असलेला त्रास सतत वाढत होता व गंभीर हायपोक्सिया सुरु झाला. तिला लगेचच अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या ईआरमध्ये आणले गेले. गंभीर स्वरूपाची घरघर, त्रास, श्वसनकार्य टाईप १ पद्धतीने निकामी झालेले अशा तक्रारी तर होत्याच शिवाय ती कोल्ड शॉकमध्ये देखील होती. या बाळाला तातडीने इन्ट्युबेट व व्हेन्टिलेट केले गेले. हेमोडायनॅमिक स्टेबिलायजेशनसाठी तिला फ्लुईड ब्लॉल्यूजेस एफ/बी इनोट्रोपिक इन्फ्युजन्सची देखील गरज होती. तिच्यावर नेब्युलायजेशन, स्टेरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स अपग्रेडेशन असे उपचार केले गेले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव

Pune : पुण्यातील ससुन रुग्णालयातील संतापजनक प्रकार! उपचाराअभावी आदिवासी तरुणाचा तडफडून मृत्यू | Video