(प्रातिनिधिक छायाचित्र) 
नवी मुंबई

पेणमधील शाळा बंद कराव्यात; उन्हाळी सुट्टी देण्याची पालकांची मागणी

सध्या पेणमधील तापमान सुमारे ४० अंश डिग्रीच्या पुढे जाऊ लागले आहे. त्यामुळे या अशा कडक उन्हात घराबाहेर जाणे घोकादायक ठरते आहे.

Swapnil S

पेण : हवामान खात्याने वातावरणात निर्माण झालेला उष्मा लक्षात घेऊन उष्माघाताची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत परीक्षा संपून देखील अनेक शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

सध्या पेणमधील तापमान सुमारे ४० अंश डिग्रीच्या पुढे जाऊ लागले आहे. त्यामुळे या अशा कडक उन्हात घराबाहेर जाणे घोकादायक ठरते आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सध्या वातावरणामध्ये उष्मा वाढला असून, विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. वातावरणात अशी भयंकर परिस्थिती असताना देखील शाळेत विद्यार्थी जात आहेत. त्यात विद्युत महामंडळाकडून रोज सकाळी १ ते २ तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. पेणमधील शाळांमध्ये इन्व्हर्टर सुविधा नसल्याने वर्गांतील विजेवर चालणारी कोणतीच उपकरणे वापरता येत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना भयंकर उकाड्यात लहान बालकांना बसावे लागत आहे. परिणामी, काही विद्यार्थी शाळेत येणे टाळतात. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होताना दिसत आहे. तसेच जी मुले शाळेत येतात, ती मुले घरी आल्यावर वैतागतात आणि त्यांच्यातील चिडचीड करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.

"तालुक्यातील वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे उष्णतेचे प्रमाण अतिशय वाढले आहे. हे लक्षात घेऊन आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना तालुक्यातील सर्व शाळांना आदेश काढण्यास सांगितले आहे. शाळांच्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक आहेत, त्या शाळा सकाळच्या सत्रामध्ये ८ ते ११ या वेळेत सुरू ठेवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे उष्माघातापासून संरक्षण होईल." - भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकारी, पेण

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल