नवी मुंबई

चिराग लोकेच्या हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत; तपास गुन्हे शाखेकडे

या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी आरोपी अरविंद सोडा याच्यासह पाच ते सहा हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून प्रथम मुंब्रा येथून अरबाज जयासुद्दीन शेख (२५) याला अटक केली.

Swapnil S

नवी मुंबई : मानखुर्दच्या कारशेडमधील माथाडी साइट मिळविण्याच्या वादातून चिराग महेश लोके (३०) या गुंडाची निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या हल्लेखोरापैकी आणखी दोन आरोपींना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हे मुंबईसह इतर भागात पसरल्याने तसेच यात काही संघटित टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने या हत्या प्रकरणाचा तपासात आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहणारा चिराग लोके व हत्या करणारा आरोपी अरविंद सोडा या दोघांमध्ये मानखुर्दच्या कारशेडमधील माथाडी साइटचे काम मिळविण्यावरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता. याच वादातून अरविंद सोडा व त्याचे साथीदार अरबाज, पगला, शेरा व इतर पाच ते सहा हल्लेखोरांनी चिराग व त्याच्या पत्नीवर लोखंडी रॉड व इतर हत्याराच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. यात चिरागचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी आरोपी अरविंद सोडा याच्यासह पाच ते सहा हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून प्रथम मुंब्रा येथून अरबाज जयासुद्दीन शेख (२५) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सानपाडा येथून दीपक सुरेश खरटमल (२८) याला तसेच उमेश जंजाळ उर्फ गावठी (३२) या दोघांना अटक केली आहे. यातील अरबाज शेख याला न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

चिराग लोके याच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार या हत्या प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

-तानाजी भगत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरूळ पोलीस ठाणे)

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली