नवी मुंबई

मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक; २१ मोबाईल हस्तगत

उलवे सेक्टर १७ येथील एका मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून आतील ३२ मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती.

Swapnil S

नवी मुंबई : उलवे सेक्टर १७ येथील एका मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून आतील ३२ मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ४८ तासांच्या आत तीन आरोपींना जेरबंद केले. या आरोपींकडून २१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. मुक्तार इरफान बंजारा, इमरान नजीर खान उर्फ डब्लू, युसूफ जान मोहम्मद बंजारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून तिघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.

उलवे सेक्टर १७ येथील सुदेशना मोबाईल शॉप या दुकानाचे शटर उचकटून दोन अनोळखी व्यक्तींनी दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे ३२ मोबाईल चोरी केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी घरफोडी केल्याचा गुन्हा न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमित काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांगडे यांच्या मार्गदर्शखाली दोन पथक स्थापन करण्यात आले होते. तपास करताना सीसीटीव्हीत एक संशयित व्यक्ती आणि एक रिक्षा आढळून आली. त्याचा तांत्रिक तपास केला असता रिक्षा मुंबईत गेली असल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारावर कुर्ला परिसरातून रिक्षा आणि तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आरोपींकडून २१ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. हस्तगत केलेल्या २१ मोबाईलची किंमत ३ लाख ९० हजार रुपये इतके आहे. यातील काही आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस