अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला 
नवी मुंबई

अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला

उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे परदेशातून आलेल्या टायर कंटेनरमध्ये तब्बल उत्तर अमेरिकन खंडातील ‘कॉर्न स्नेक’ किंवा ‘रेड रॅट स्नेक’ हा विदेशी प्रजातीचा साप आढळून आला आहे. कंटेनर तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना हा साप दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Swapnil S

उरण : उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे परदेशातून आलेल्या टायर कंटेनरमध्ये तब्बल उत्तर अमेरिकन खंडातील ‘कॉर्न स्नेक’ किंवा ‘रेड रॅट स्नेक’ हा विदेशी प्रजातीचा साप आढळून आला आहे. कंटेनर तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना हा साप दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर जेएनपीटी बंदरातून परदेशातून आयात केलेल्या टायरसह उरण परिसरात आला होता. तपासणीदरम्यान एक नारंगी रंगाचा आकर्षक पट्टेरी साप दिसल्याने व्यवस्थापनाने तत्काळ बचावासाठी ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे स्वयंसेवक स्वप्नील म्हात्रे यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर फॉनचे बचावकर्ते जयेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षितरीत्या पकडून त्याची काळजी घेतली. सदर साप पुढील कारवाईसाठी उरण वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला

सर्पतज्ज्ञांना चिंता

हा कॉर्न स्नेक बिनविषारी असून, यापासून मानवाला कोणताही धोका नाही. परंतु भारतात अशा विदेशी प्रजातींची उपस्थिती पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते. कारण त्या स्थानिक सर्पप्रजातींसाठी प्रतिकूल ठरू शकतात. त्यामुळे अशा सापांना त्यांच्या मूळ अधिवासात परत पाठविणेच उचित असल्याचे सर्पतज्ज्ञांचे मत आहे.

Mumbai: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; १७ फेब्रुवारीला 'या' मार्गांवर वाहतूक निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार एप्रिलमध्ये लागू होण्याची शक्यता; सरकारी अधिकाऱ्याची माहिती

Mumbai : बनावट पदवी प्रकरणात मुंबई न्यायालयाने केली लॉ कॉलेजच्या माजी उपप्राचार्याची निर्दोष मुक्तता

राज्यभरात ‘एटीएस’चे धाडसत्र; यवतमाळमध्ये १४, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे

मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४०४ कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात वाढ