उरण परिसरात पावसाळी आजारांचा ‘ताप’; डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत वाढ 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

उरण परिसरात पावसाळी आजारांचा ‘ताप’; डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत वाढ

उरण परिसरात पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, काविळ आणि डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

Swapnil S

उरण : उरण परिसरात पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, काविळ आणि डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदा या आजारांचे रुग्ण दुपटीने वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

बेलपाडा गावात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उरण परिसरात पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

उरण परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा दूषित होत असल्याने तसेच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आजारांना पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी