सायबरसुरक्षा म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा यांसारख्या इंटरनेट-कनेक्टेड सिस्टमचे सायबर धोक्यांपासून संरक्षण करते. संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यांचा समावेश होतो. आपण आज आधुनिक युगात आहोत, जिथे पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन उपकरण यांच्यात वाढ होत आहे. त्यामुळे सायबरसुरक्षेचे महत्व ही वाढले आहे. आपल्या जीवनात काही गोष्टी संवेदनशील असतात, त्या गोपनीय माहितीची सुरक्षा व्हावी म्हणून सायबरसुरक्षा असणे गरजेचे आहे.
सायबरसुरक्षेचे फायदे काय?
सायबर हल्ले किंवा आपली वैयक्तिक माहिती चोरी होणार नाही याची खात्री असते. तसेच, कोणीही अनधिकृतपणे आपली साईट वापरू शकत नाही. इंटरनेटवरील धोक्यापासून संरक्षण तसेच उपकरणांची सुरक्षा होते. नेटबँकिंगची कामे सुरक्षित पार पडतात.
सायबरसुरक्षेचा फायदा कोणाला?
आताच्या जगात आपण सर्व इंटरनेटचा वापर करतो. त्यामुळे सध्याच्या घडीला सायबरसुरक्षा ही प्रत्येकाची गरज आहे. आरोग्यसेवा, छोटे व्यवसाय, सरकारी संस्था, उत्पादन, वित्तीय संस्था, शिक्षण यांनाही आपला डेटा गोपनीय ठेवण्यासाठी सायबरसुरक्षेची गरज लागते. तसेच ती आपला बँकिंग डेटा सुरक्षित ठेवते. बँकिंग डेटा सुरक्षित नसल्यास कोणीही आपल्या खात्यांमधून पैसे काढू शकते.
सायबरसुरक्षा कशी काम करते?
सायबरसुरक्षेच्या अंतर्गत एक टीम असते, जी तुमचा देता सुरक्षित ठेवते. कोणतीही चुकीची गोष्ट घडण्यापासून ती वाचवते. तसेच, सायबरसुरक्षेचा फायदा हा इंटरनेट सेवा व उपकरणाला सुरक्षित ठेवण्यासाठीही होतो.
सायबरसुरक्षा कशी करावी?
> तुमचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा.
> अँटी-व्हायरस सुरक्षा वापरा.
> चांगला मजबूत पासवर्ड ठेवा.
> कोणताही असुरक्षित किंवा सार्वजनिक ठिकाणाचा वायफाय वापरू नका.
> कोणत्याही अनोळखी मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका.
> कोणत्याही अपरिचित साईटवर आपली माहिती शेअर करू नका.