वाढत्या हिंसक निदर्शनांदरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. तिकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. हिंसाचार इतका भडकला आहे की, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच हल्ला केला.  Photo Credit: X
फोटो

शेख हसीनांच्या घरात घुसून आंदोलनकर्त्यांची लुटपाट; साडी-ब्लाउज, खुर्ची, पंखा, बकरी काहीच नाही सोडलं!

Tejashree Gaikwad
पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी लुट केली आहे. याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहे.
आंदोलकांनी तिथून खुर्च्या, टेबल, सोफा, कुराण, दिवे, महागडे पंखे, फर्निचर, प्लांट, आरओ प्युरिफायर, टीव्ही, ट्रॉली बॅग, एसी, गाद्या असा मोठा वस्तू लुटून नेल्या.
फक्त घरातल्याच गोष्टी नाही तर हसीना यांचे कपडे आणि वैयक्तिक वस्तू घेऊन जाताना आंदोलक दिसत आहेत.
याशिवाय कोणी बागेतील बदक तर कोणी शेळी लुटली. हे सर्व करत असताना लोक अभिमानाने स्वत:चे फोटो काढत आहेत.
काही लोक हसीना यांच्या बेडरूमची लूट करत आहेत. त्यांनी बेडवरच्या गाडीचीही लूट केल्याचे दिसून येत आहे.
एक व्यक्ती कॉर्डलेस फोन घेऊन पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडली.
एक व्यक्ती हातात अंतर्वस्त्र घेऊन जाताना दिसला.
टीव्ही ते अंतर्वस्त्र आंदोलकांनी काहीच ठेवलं नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून दिसत आहे.
काही आंदोलक शेख हसीनाच्या पलंगावर आराम करताना दिसत आहे. त्यांच्या बेडवर झोपून फोन बघत झोपलेले आहेत.
हसीना यांच्या घरातील लुटीनंतर आंदोलकांनी अवामी लीगच्या अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या घरांवर, कार्यालयांवरही हल्ले केले.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात हिंसाचार सुरू होता, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण सोमवारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले, त्यानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला.

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

‘इमर्जन्सी’ पुन्हा लांबणीवर; सर्टिफिकेट देण्याचा निर्णय २५ सप्टेंबरपूर्वी घ्या, सेन्सॉर बोर्डाला HC चा आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य

मुख्यमंत्री काँग्रेसचाच! बाळासाहेब थोरात यांचा दावा