Children's Day Gift Ideas : खेळणी नकोत, मुलांना द्या 'हे' भन्नाट गिफ्ट्स; लहानपणापासून लागेल चांगल्या सवयींची गोडी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच १४ नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना आनंद देण्यासोबतच त्यांच्या आवडी आणि कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस खास ठरतो.कलरफुल पेन्सिल पाउच : मुलांना बालदिनानिमित्त आकर्षक आणि सुंदर डिझाइन असलेला पेन्सिल पाउच गिफ्ट देऊ शकता. यामध्ये ते पेन्सिल, पेन, खोडरबर आणि रंग व्यवस्थित ठेवू शकतात.जर्नलिंग किट : मुलांना आपल्या भावना, विचार आणि रोजच्या आठवणी लिहिण्याची सवय लावायची असेल तर जर्नलिंग किट हा उत्तम पर्याय आहे. रंगीबेरंगी स्टिकर्स, पेन आणि डायरीच्या मदतीने मुलांना क्रिएटिव्ह पद्धतीने व्यक्त होता येईल.मधुबनी आर्ट किट : मुलांना भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी मधुबनी आर्ट किट भेट देऊ शकता. रंगकाम आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांची कल्पनाशक्ती आणि कलागुण विकसित होण्यास मदत होईल.इलेक्ट्रॉनिक पिगी बँक : मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लावायची असेल तर इलेक्ट्रॉनिक पिगी बँक एक भन्नाट गिफ्ट ठरू शकते. यामध्ये पैसे जमा करताना मुलांना पैशांचे महत्त्व आणि बचतीची गोडीही लागेल.स्टोरी बुक्सचा सेट : मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गोष्टींची किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची पुस्तके भेट द्या. या पुस्तकांमधून त्यांना महान शास्त्रज्ञ, संशोधक आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेता येईल.क्राफ्ट किट : मुलांना काहीतरी नवीन तयार करण्याची आवड असेल तर त्यांना क्राफ्ट किट भेट देऊ शकता. यामुळे त्यांची कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि हाताने काम करण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.यंदाच्या बालदिनाला केवळ खेळणी न देता मुलांच्या आवडीला आणि शिकण्याला चालना देणारी गिफ्ट्स द्या. अशा छोट्या भेटवस्तू त्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर घालू शकतात.