तुम्ही पीजी किंवा वसतिगृहात किंवा बॅचलर राहत आहात? तुमच्याकडे गॅस शेगडी किंवा स्टोव्ह उपलब्ध नाही. तरीही तुम्ही अन्न न शिजवता झटपट आणि टेस्टी स्नॅक्स बनवू शकता. विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही.
व्हेज सँडविच - व्हेज सँडविचसाठी तुम्ही ब्रेड आणि तुमच्या आवडत्या फळभाज्या जसे टोमॅटो, काकडी, बीट, गाजर, कोबी इत्यादींचा वापर करून तुम्ही छान व्हेज सँडविच बनवू शकता. फ्रूट चाट - बाजारात तुमच्या जवळपास जी फळे उपलब्ध असतील त्यांचा वापर करून तुम्ही छान फ्रूट चाट बनवू शकता. यामध्ये तुम्हाला फळे कापून त्यावर फक्त चाट मसाला घालायचा आहे. दही केळी - दही केळी हा एक चविष्ट पदार्थ आहे. विशेषकरून उन्हाळ्यात या पदार्थाचे सेवन केल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते. दह्यामध्ये केळ्यांचे छोटे तुकडे करून घाला. यामध्ये मध आणि साखर घाला. सोबत थोडी काळीमिरीपूड घाला. यामुळे छान चव येते. तसेच याच्या जोडीला थोडा सुका मेवा सुद्धा घातला तर ते आणखी चविष्ट लागेल. मिनी पिझ्झा - प्लेट किंवा वाटीने ब्रेड गोल आकारात कापून घ्या. यावर तुम्ही कांदा, शिमला मिरची, सॉस, बारीक शेव घालून मिनी पिझ्झा बनवू शकता. दही पोहे - दही पोहे हा एक पारंपारिक पदार्थ आहे. तुम्ही पोहे भिजवून घ्या. त्यामध्ये दही घाला. जोडीला हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घाला. झाली तुमची डिश तयार. याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये बारीक शेव, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे घालू शकता. मखाना भेळ - बाजारात छान भाजलेले मखाने उपलब्ध असतात. या भाजलेल्या मखान्यात कांदा, टोमॅटो, कच्ची कोथिंबीर कापून घाला. मखाना भेळ तयार आहे. मोड आलेल्या धान्याची भेळ
हा देखिल एक पौष्टिक नाश्ता होऊ शकतो. मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी, काकडीचे छोटे तुकडे, डाळिंबाचे दाणे, चवीसाठी बारीक शेव आणि चाट मसाला घालून भेळ तयार करू शकता. काकडी चाट - काकडी छान सोलून घ्या, त्याचे दंडगोल आकारात तुकडे करा. काकडीचा आतील भाग काढून घ्या. आता यामध्ये स्वीटकॉर्न, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घाला. स्वादिष्ट काकडी चाट तयार आहे.