(सर्व फोटो सौ- फ्रीपीक)
फोटो

Parenting Tips : लहान मुलांना स्क्रीनपासून लांब कसे ठेवावे?

Kkhushi Niramish
डिजिटल युगात मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही या उपकरणांमुळे सगळ्यांच्याच जीवनशैलीत स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष करून लहान मुलांना या गोष्टीपासून लांब ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. याचे विपरित परिणाम आरोग्यावर होत आहेत. जाणून घेऊया लहान मुलांना स्क्रीनपासून कसे लांब ठेवावे?
सर्वप्रथम लहान मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा. दिवसभरात ठराविक विशिष्ट वेळ ठरवून घ्या, तेवढ्याच वेळात त्यांना मोबाईल, स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर करायला द्या.
लहान मुलांना वेगवेगळ्या खेळण्यांसोबत खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.
त्यांची खेळणी अशी असावी ज्यामध्ये त्यांची रचनात्मक शक्ती वाढावी. सृजनशीलता वाढावी.
तुम्ही स्वतः देखील लहान मुलांसोबत खेळत जा. जेणेकरुन त्यांनाही मैदानी किंवा बैठी खेळ खेळण्याची मजा येईल.
खेळण्याच्या माध्यमातून त्यांचा बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न करा. तशी अनेक खेळणी हल्ली बाजारात उपलब्ध आहेत.
मुलांना सकाळ किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर घेऊन जा. जवळच्या बागेत किंवा चिल्ड्रन्स पार्कमध्ये त्यांच्यासह वेळ घालवा.
चित्रकला हा देखील मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यांना त्यांचे आवडीचे चित्र काढण्यासाठी प्रेरित करा.
लहान मुलांना स्वयंपाकासारख्या गोष्टीतही रस निर्माण होऊ शकतो. त्यांना जे पदार्थ आवडतात आणि जे बनवायलाही सोपे आहेत अशा पदार्थांच्या कृतीबाबत त्यांना सांगा. तथापि, गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीपासून किंवा ते कसे चालू आणि बंद करतात याबाबत त्यांना सांगू नका आणि सक्त ताकीद द्या. सुरक्षेविषयी समजून सांगा.
लहान मुलांसोबत बसून निरनराळी पुस्तके वाचा. वाचनाची आवड निर्माण होईल अशी पुस्तकं त्यांना आणून द्यायचा प्रय़त्न करा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा तुमच्या मुलांसोबतचा संवाद वाढवा. त्याच्याशी शक्य तितक्या खेळीमेळीच्या वातावरणात बोलत जा. मोबाईलसाठी लहान मुलांनी कितीही रडारड किंवा आरडाओरडा केला तरी त्यांना त्यापासून दूर ठेवा आणि अन्य आवडीच्या क्रियांमध्ये गुंतवून ठेवा.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस