All Photo- Masteer Recipes
मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य - किसलेला मुळा, कोथिंबीर, मीठ, साखर, हिरवी मिरची, हिंग आणि फोडणीचे साहित्य.
सर्व प्रथम दही चांगले फेटून घ्या. दही मिक्सरमध्ये फेटू नये. त्यामुळे दह्याला पाणी सुटते.दही फेटल्यानंतर अशा पद्धतीने दिसायला हवेया फेटलेल्या दह्यात मीठ, थोडी साखर, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि मुळा घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.फोडणीसाठी पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करा.यामध्ये जीरे, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हिंग घालून फोडणी द्या.मुळा आणि दहीच्या एकजीव केलेल्या मिश्रणात ही फोडणी घाला. खमंग, चवदार मुळ्याची कोशिंबीर तयार आहे.