घराजवळ लावा हे एक झाड, साप आसपास सुद्धा येणार नाही असह्य  Canva
फोटो

Snake : पावसाळ्यात घरात साप शिरण्याची भीती वाटते? मग लावा हे एक झाड, साप जवळही येणार नाहीत

Pooja Pawar
सर्पगंधा हे असे एक झाड आहे ज्याच्यातील प्राकृतिक गुणांमुळे साप त्याच्या जवळ येत नाहीत. तेव्हा तुम्ही हे झाड घराजवळच्या अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्याजवळ सुद्धा लावू शकता.
सर्पगंधाचं साइंटिफिक नाव हे सवोल्फिया सर्पेतिना असं असून या झाडाचा वास खूप असह्य असतो. याचा वास सापांना सहन होत नाही त्यामुळे ते या झाडापासून दूर राहतात. तर केवळ सापाचं नाही तर विषारी प्राणी सुद्धा या झाडापासून दूर राहतात.
सर्पगंधा हे झाड केवळ सापांना दूर ठेवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले मानले जाते. उच्च रक्तदाब, निद्रानाश या आजारांवर हे झाड आयुर्वेदानुसार खात्रीशीर उपाय आहे. तसेच सर्पगंधामुळे कफ आणि वात सुद्धा बरा होतो.
सर्पगंधा या झाडाचं पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे सर्पगंधा या झाडाला आयुर्वेदात खूप महत्व दिले जाते.
सर्पगंधाचे झाडाची मूळ ही पिवळ्या आणि तपकिरी रंगाची असतात. तसेच सर्पगंधा शिवाय लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुलसी, प्याज, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास ही झाडं सुद्धा तुम्ही घराजवळ लावू शकता. यामुळे साप तसेच इतर विषारी प्राणी आसपास येणार नाहीत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही.)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला