राजकीय

केडीएमसीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी सगळ्या जागा लढवणार ?

२४ वर्षे कल्याण डोंबिवली महापोलीकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. असे असताना देखील नागरिकांना नागरी सुविधांसाठी पायपीट करावी लागत आहे

प्रतिनिधी

आम आदमी पार्टीच्या वतीने केडीएमसीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीची जय्यात तयारी सुरु असून केडीएमसीच्या ४४ प्रभागांमध्ये १३३ नगरसेवक उभे करण्याचा मानस असल्याचे आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष राजेश शेलार, कल्याण पूर्व अध्यक्ष साधना कमलेश पार्टे हे उपस्थित होते.

गेली २४ वर्षे कल्याण डोंबिवली महापोलीकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. असे असताना देखील नागरिकांना नागरी सुविधांसाठी पायपीट करावी लागत आहे. गेल्या महिन्या भरापासून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणी डोंबिवली भागात घरो घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. यात महत्वाचे म्हणजे काही भागात अजूनही कर भरणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काही भागात अजूनही पाणी चोरी आणि पाणी गळतीचे प्रकार समोर येत असतात. त्यामुळे जर या केडीएमसीच्या निवडणुकीत निवडणूक आले तर दिल्ली प्रमाणे पाणी मोफत देण्याची आमची मनशा असल्याचे जोगदंड यांनी संगीतले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाला धोरण अद्याप तयार केलेलं नाही. एकीकडे ओपन लँड टॅक्स कमी करून बिल्डर्सना मदत केली तर दुसरीकडे करदात्या नागरिकांच्या मालमत्ता करत मात्र कपात केलेली नाही. हा दुजाभाव हा केडीएमसीच्या व्यवहारात दिसून येत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे नागरिकान नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

या होणाऱ्या केडीएमसीच्या निवडणुकीत पॅनल पद्धतीला विरोध केला होता तसेच राज्यपालांकडे निवेदन देऊन पॅनल पद्धत नको, त्यामुळे लहान पक्षांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे हि पॅनल पद्धत रद्द करून एक प्रभाग एक नगरसेवक हि पद्धत लागू करावी अशी मागणी करण्यात आली होती.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप