राजकीय

अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांच्या भेटीने राज-उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान ; चंद्रकांत खैरे म्हणाले...

दोघांनी एकत्र यावं असे बॅनर देखील लागले होते

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्रारात सुरु झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं याबाबत चर्चा सुरु आहेत. या दोन्ही नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरुन एकत्र यावं अशी इच्छा अनेक कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत प्रस्ताव दिला असल्याचं सांगितलं जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या आज झालेल्या भेटीने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, राज ठाकरेंनी अभिजित पानसे यांना संजय राऊत यांच्याकडे पाठवून युतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आता चर्चा होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत म्हणून सर्व जनता वाटत आहे. ते एकत्र यावे अशी अनेकांची इच्छा आहे. पण सध्या काही म्हणता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी आपापसातील मतभेद विसरुन एकत्र यावं अशी दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत अनेकांनी इच्छा बोलून दाखवली आहे. दोघांनी एकत्र यावं असे बॅनर देखील लागले होते. आता अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांच्या भेटीने या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. दरम्यान, या भेटीवर अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांनी मला राजकारणात आणलं असून बऱ्याच दिवसापासून त्यांची भेट झाली नव्हती, त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचं ते म्हणाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर